Oxford Compact English-English-Marathi Dictionary
कॉम्पॅक्ट इंग्रजी-इंग्रजी-मराठी शब्दकोश
Price: 445.00 INR
ISBN:
9780199490745
Publication date:
29/12/2017
Paperback
816 pages
176x112mm
Price: 445.00 INR
ISBN:
9780199490745
Publication date:
29/12/2017
Paperback
816 pages
Oxford University Press & रमेश वा. धोंगडे
द्विभाषा शब्दकोशांची गरज ही दोन्ही भाषांच्या सामर्थ्यावर आणि विस्तृत वापरावर निर्माण होते आणि वाढते. मराठी भाषकांची संख्या आणि त्यांचे विविध ज्ञानक्षेत्रातील कार्य हे जसे मराठीच्या विकासाला उपयुक्त होते त्याचप्रमाणे त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे इंग्रजीच्या विस्तारास आणि वैशिष्ट्यांस उपकारक ठरते आहे. दोन भाषांच्या वापराची विस्तारत होणारी क्षेत्रे आणि त्यांचा वाढत जाणारा वापर यामुळे नित्य नव्याने द्विभाषा कोश निर्माण होत असतात. इंग्लिश-इंग्लिश-मराठी या तिसऱ्या कोशाच्या निर्मितीमागेही ही कारण-परंपरा आहे.
- Includes over 24,000 words, phrases and meanings in simple English with detailed translations in Marathi
- Accurate pronunciation of the English words
- 1,100 synonyms and opposites
- Includes idioms, phrasal verbs, derivatives and words with irregular forms
- Provides 2,000 keywords that are the most important words to know in English
- 13,000 example sentences
- Additional pages on irregular verbs, geographical names and study pages on prepositions of place and movement, numbers, time and dates, telephoning, words that go together, words related to health, writing letters and emails
- 500 notes on spelling, grammar and pronunciation
- Provides over 200 illustrations
Oxford University Press & रमेश वा. धोंगडे
Description
द्विभाषा शब्दकोशांची गरज ही दोन्ही भाषांच्या सामर्थ्यावर आणि विस्तृत वापरावर निर्माण होते आणि वाढते. मराठी भाषकांची संख्या आणि त्यांचे विविध ज्ञानक्षेत्रातील कार्य हे जसे मराठीच्या विकासाला उपयुक्त होते त्याचप्रमाणे त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे इंग्रजीच्या विस्तारास आणि वैशिष्ट्यांस उपकारक ठरते आहे. दोन भाषांच्या वापराची विस्तारत होणारी क्षेत्रे आणि त्यांचा वाढत जाणारा वापर यामुळे नित्य नव्याने द्विभाषा कोश निर्माण होत असतात. इंग्लिश-इंग्लिश-मराठी या तिसऱ्या कोशाच्या निर्मितीमागेही ही कारण-परंपरा आहे.
कोश कुणासाठी? या प्रश्नाचे उत्तर कोश वापरणाऱ्या विशिष्ट वाचकासाठी असे असले तरी असा विशिष्ट वाचक हा कोणत्याही राजकीय, सामाजिक वा आर्थिक वर्गात बंदिस्त करता येत नाही. कारण वाचकाची भाषिक क्षमता हा एकमेव निकष कोशाबाबतची त्याची गरज व कोशकडून त्याच्या अपेक्षा ठरताना वापरला जातो. या कोशाची उपयुक्तता इंग्रजी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व असणाऱ्या, संगणकासारख्या नवीन ज्ञानशाखांमधे वावर असणाऱ्या, स्वतःच्या इंग्रजी-क्षमतेची तपासणी करण्यास उत्सुक असणाऱ्या आणि इंग्लंड-अमेरिकेतील इंग्रजी भाषेशी जवळीक साधण्याची इच्छा असणाऱ्या चलाख व उत्साही वाचकाला मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वाचकाला हा कोश इंग्रजीवरील त्याचे प्रभुत्व डोळसपणे वाढविण्यास निश्चितच उपयोगी पडेल.
या कोशात सुमारे २५,००० शब्द आहेत. या कोशाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक शब्दानंतर आंतरराष्ट्रीय ध्वनि-लिपीनुसार त्याचा उच्चार दिला आहे. इंग्रजी संभाषणची हौस असणाऱ्या वाचकाला या कोशात दिलेले अमेरिकन इंग्रजी व ब्रिटीश इंग्रजी यातील फरक मोलाचे वाटतील.
उच्चारानंतर प्रत्येक शब्दाची व्याकरणिक जाती (नाम, क्रियापद वगैरे) आणि त्या शब्दाची विविध रूपे दिली आहेत. या कोशात वाचकाच्या सोयीसाठी एकाच शब्दाखाली त्याचे सर्व अर्थ दिले आहेत. फक्त जाती बदलते तेथेच नवीन नोंद केली आहे. शब्दाचा अर्थ शास्त्रीय व्याख्या करून देण्याऐवजी वाचकाला सहजपणे समजेल अशा वर्णनात दिला आहे.
भाषा ही लोकव्यवहारानुवर्ती असते. ती दीर्घ काळ स्थितिशील राहात नाही. लोकव्यवहारातून तिचे रूप हळूहळू पण निश्चितपणे बदलते. म्हणूनच भारतीय इंग्रजीत रूढ असणारे काही शब्दार्थ (उदाहरणार्थ wind up हा शब्द पाहा) आणि ब्रिटिश, अमेरिकन इंग्रजीत रूढ नसल्यामुळे या कोशात दिलेले नाहीत. उलट winge सारखे अन्य कोशातही न आढळणारे शब्द प्रचलितपणामुळे या कोशात दिलेले आहेत. शब्दांचा केवळ अर्थ देण्यापेक्षा त्यांचा प्रत्यक्षात वापर कसा होतो हे कळणे इंग्रजी शिकणाऱ्याला जास्त महत्त्वाचे आहे. या कोशात दिलेली इंग्रजी भाषेत ही ब्रिटनमधील लोकांच्या प्रत्यक्ष बोलण्यातील व लेखनातील असल्यामुळे त्यांचा अस्सलपणा लक्षणीय आहे. अशी अस्सल उदाहरणे अन्यत्र सापडणे कठीण.
कोशातील चौकटीतील मजकूर हे या कोशाचे आगळे वैशिष्ट्य. इंग्रजी शब्दांच्या उच्चारात आणि लेखनात काय गफलती होतात, समान अर्थाचे वाटणारे शब्द प्रत्यक्षात कुठे व केव्हा वापरायचे, एका शब्दातून इतर शब्द कसे बनतात, उलट अर्थाचे शब्द कोणते, पाश्चात्य संस्कृतीचे वेगळेपण इंग्रजी भाषेत कसे प्रतिबिंबित होते, काय म्हणावे व काय म्हणू नये अशा अनेक गोष्टी या चौकटींमधे दिल्या आहेत. ही माहिती आणि कोशाच्या शेवटी दिलेले इंग्रजीचे सहज, सोपे व्याकरण यामुळे वाचकाला इंग्रजी वापरण्यासाठी भरघोस मदत होईल अशी खात्री आहे. शेवटी वाचकांचा संतोष हेच कोशकाराच्या कामाचे चीज असते.
रमेश वा. धोंगडे
About the editor
Dr R V Dhongde retired as Professor of Marathi Linguistics at the Deccan College, Pune. He has also been Chairman, English Language Committee, Maharashtra State Textbooks Bureau, Pune; and has been in charge of the Sanskrit Encyclopaedic Dictionary project at the Deccan College Pune. He is the editor of the Compact English-English-Marathi Dictionary from Oxford University Press India. Dr Dhongde has co-authored a book on linguistic grammar of Marathi and won several State awards for his books on Marathi stylistics. He has also co-authored a book on linguistic grammar of Marathi in English and at present he is co-authoring a linguistic grammar of Konkani in English. He is also preparing a Marathi-English Dictionary.

Oxford Compact English-English Odia Dictionary
B.K. Tripathy
Oxford Beginner's Japanese Dictionary
Oxford Languages
English-English-Bengali Dictionary (PLC EDITION)
Edited by Moitreyee Mitra & Dipendranath Mitra
Oxford Beginner's French Dictionary
Oxford Dictionaries & Marie-Hélène Corréard (Chief Editor)
Oxford Essential French Dictionary (First Edition)
Oxford Languages
Oxford School Spanish Dictionary
Oxford University Press
Oxford Paperback French Dictionary (Third Edition)
Oxford University Press
English-English-Tamil Dictionary
Editor Dr V. Murugan & V. Jayadevan